top of page

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही मराठी माणसाच्या गळ्यातले ताईत आहेत. आजचा महाराष्ट्र आणि भारत शिवशंभूंचा शतशः ऋणी आहे; पण शिवरायांनी निर्माण केलेले हे स्वराज्य रक्ताचे पाणी करून टिकवणाऱ्या शिवरायांच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाकडे महाराष्ट्राचे अक्षम्य दुर्लक्ष झाले, आहे असे ताराबाईंचा इतिहास वाचल्यावर माझे मत बनले. औरंगजेबाच्या पुरावर बसून त्यांनी स्वराज्य राखले आणि वाढवले. ही गोष्ट फक्त इतिहासकारांच्या आणि अभ्यासकांच्या पुरती मर्यादित होऊन राहिली आहे. त्यामुळे महाराणी ताराबाईंचा हा जाज्वल्य पराक्रमाने भरलेला इतिहास लाखो तरुणांच्या पर्यंत सोप्या भाषेत जुन्या आणि नव्या डिजिटल पद्धतीने नेऊन महाराणी ताराबाईंनी केलेला पराक्रम; आणि त्यांचे भविष्य काळावर म्हणजेच आपल्या वर्तमानावर असलेले उपकार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. चला जगाला सांगूया या देशातल्या सगळ्यात मोठ्या बादशहाला नमवणाऱ्या आमच्या एका महान पराक्रमी राणीची गोष्ट.

 

- रणजीत यादव (लेखक)

अजिंक्य ताराराणी (Ajinkya Tararani)

₹120.00Price

    महाराष्ट्र ग्रंथ भांडार

    Maharashtra Granth Bhandar

    Mahadwar Road,

    Kolhapur 416012

    Maharashtra, India.

    Phone no.:- 0231-2541433, 9923403944

    © 2024 Maharashtra Granth Bhandar.

    bottom of page