महाभारत हा आपलाच नव्हे तर जगाचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणावा लागेल. मानवाच्या इतिहासात महाभारताएवढा जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारा दुसरा ग्रंथ नाही. अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राजकारण, समाजकारण, धर्मविचार, अध्यात्म, कथासाहित्य इत्यादींचा हा ग्रंथ म्हणजे एक विशाल ज्ञानकोश असून आजच्या कित्येक समस्या सोडविण्यासाठी त्याचा उपयोग होण्यासारखा आहे.
संस्कृत महाभारताचा हा जशाचा तसा अनुवाद नाही, भाषांतर तर नाहीच नाही. व्यास महर्षींच्या भव्य व अगाध प्रज्ञेचे एतिहासिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टीकोनातून दर्शन घडविण्याचा हा एक अभिनव प्रयत्न आहे. भूतकाळाचा मागोवा घेऊन वर्तमानकाळ घडविण्याचा हा एक अभिनव असा प्रयोग आहे. येथे महाभारतातील व्यक्तींच्या विचारांचे, विविध घटनांचे वर्तमान काळाच्या संदर्भात काय स्थान आहे याचा विचार केला आहे.म्हणून दसनूरकर यांच्या महाभारतात सर्वसामान्य माणसाच्या संघर्षमय जीवनाचे हुंकार पानोपानी दिसतात.
आपले महाभारत- खंड १ व २ (Aaple Mahabharat)
पृष्ठे - अंदाजे २५२०
आकार - डबल क्राऊन
किंमत - ₹ २,०००/-