प्रा. शशिकान्त कुलकर्णी यांचे तत्वमसि हे पुस्तक म्हणजे भारतीय संस्कृतीचा, ती संस्कृती विकसित करणाऱ्या माणसांचा, त्यांच्या जीवनमूल्यांचा एक आढावा. वेदकाळ ही याची सुरवात. वेदकळापासून ते स्वतंत्र भारत, असा हा साधारण पाच हजार वर्षांचा कालखंड. एवढा अवाढव्य कालखंड तीनशे पानात कुलकर्णी सरांनी वाचकांसमोर चक्षुर्वैसत्यं सादर केला आहे. 'चक्षुर्वैसत्यम्' असे म्हणण्याचे कारण असे की हा सुमारे पाच हजार वर्षांचा कालप्रवाह कुलकर्णी सरांनी तुमच्या आमच्या जगण्याशी निगडित केला आहे आणि तुम्हा आम्हाला त्या कालप्रवाहातल्या विचारधारेत सहभागी करून घेतले आहे.
तत्वमसि (Tatwamasi)
₹500.00Price